रिवॉर्ड पाँईटसह कॅशबॅक ऑफर : आर्थिक ट्रॅकिंग देखील होणार सोपे
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
युनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय)मध्ये गेल्या काही महिन्यात बरीच वाढ झाली आहे. यापूर्वी क्रेडिट कार्डधारकांना युपीआय द्वारे पेमेंटचे फायदे घेता येत नव्हते. हा नियम नुकताच रुपे क्रेडिट कार्ड सुरु झाल्याने बदलला आहे. यामुळे आता ग्राहकांना रुपे क्रेडिट कार्डच्या मदतीने युपीआयवर सहज पेमेंट करता येणार असल्याची माहिती आहे.
रुपे कार्ड भारताचे
रुपे हे देशांतर्गत प्लास्टिक कार्ड आहे जे नॅशनल पेमेंटचे कॉर्पोरेशन इंडियाने लाँच केले आहे. देशातील पेमेंट सिस्टम एकत्रित करणे हा त्याचा उद्देश आहे.
..या संबंधीचे होणारे लाभ
- व्यवहारात सुलभता : बिले, ऑनलाईन शॉपिंग आणि पीअर टू मर्चंट ट्रान्सफरसह सर्व देयके एकाच प्लॅटफॉर्मवर, युपीआयने करता येणार. वेगवेगळ्या अॅप्स किंवा प्लॅटफॉर्ममध्ये शोधण्याची गरज नाही.
- रिअल टाइम व्यवहार : युपीआय व्यवहारांची प्रक्रिया रिअल टाइममध्ये केली जाते. यात व्रेडिट कार्ड फंड वापरुन झटपट पेमेंट करता येते. आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाच्या व्यवहारांसाठी हा पर्याय फायदेशीर
- रिवॉर्ड पाँईट व कॅशबॅक : रुपे युपीआय क्रेडिट कार्ड व्यवहारांवर रिवॉर्ड पॉईंट व कॅशबॅक आदी सवलती उपलब्ध, कारण व्यवहार अजूनही कार्डच्या मदतीने केले जातात. याचा फायदा होतो.
- आर्थिक ट्रॅकिंग व्यवस्थापन : युपीआयला रुपे क्रेडिट कार्डशी लिंक केल्याने व्यवहारांचे केंद्रीकरण होते आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा व व्यवस्थापन करणे सोपे होते.
- ऑनलाईन खरेदीची सुलभता : दोन्ही एकत्रिक लिंक केल्यास प्रत्येक वेबसाईटवर व्रेडिट कार्ड तपशील न टाकता युपीआयच्या मदतीने क्रेडिट कार्डच्या आधारे ऑनलाईन खरेदीला पैसे देता येणार असल्याची सोय उपलब्ध होणार आहे.
लिंकची सुविधा उपलब्ध
सप्टेंबर महिन्याच्या 21 तारखेपासून युपीआयशी क्रेडिट कार्ड लिंकची सुविधा सुरु करण्यात आली आहे. ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी युपीआय नेटवर्कवर रुपे क्रेडिट कार्ड सादर केले आहे.









