ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारतीय संस्कृतीत आहारा बाबतीत अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याचा आपल्याला फायदा तर होतोच शिवाय आपल्या खिशातील पैसेही वाचतात. यात मग खाद्यपदार्थ कसे असावेत यापासून तुमच्या जेवनाच्या वेळा कशा असाव्यात. जेवताना बसण्याची पध्दत कशी असावी. याची माहिती दिली आहे. मात्र बदलत्या जिवनशैलीमुळे आपल्या खाण्याच्या पध्दती बदलल्या आहेत. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण आपणच दिले आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पध्दती होती. सर्वजण एकत्र जेवायला बसायचे. याचे दोन फायदे व्हायचे. एकतर पोटभर जेवण आणि दुसरे म्हणजे घरातील इतर कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा. यामुळे दिवसभर आलेला ताण-तणाव कमी होत होता. तसेच ताटात वाढलेले सर्व पौष्टिक पदार्थ खाल्ले जायचे. दुसर असं की आता डायनिंग टेबलची फॅशन आली आहे. त्यावेळी जमिनीवर खाली मांडी बसून जेवले जायचे यामुळे अन्नपचन चांगले व्हायचे. याशिवाय पाठीच्या दुखण्यापासून मुक्तता मिळायची. जमिनीवर बसून जेवायचे खूप फायदे आहेत. ते नेमके कोणते हे जाणून घेऊया.
आरोग्यासाठी चांगलं
भारतीय आयुर्वेदानुसार जमिनीवर आपण जेवायला बसतो तेव्हा एका आसन होते. निवांतपणे बसून जेवूही शकतो आणि यामुळे आपले पद्मासनही आपोआप होवून जाते. आपण ठरवलं तरीही आसन होत नाही. मात्र यामुळे आपल्याकडून एक आसन आपोआप होवून जाते. ज्याचा आपल्या आरोग्यासा फायदाच होतो.
वजन नियंत्रित येण्यास मदत होते
जमिनीवर जेवायला बसल्यावर काही ना काही घेण्यासाठी उठाव लागतं. यामुळे अर्ध पद्मासन हे आसन होते. यामुळे जेवण हळूहळू जेवले जाते आणि पचनास मदतच होते. याचा फायदा वजन कमी करण्यास होतो.
रक्तदाब नियंत्रित राहतो
ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे अशा लोकांनी जमिनीवर बसून जेवणाला पसंदी दिली पाहिजे. यामुळे पाठिचा कणा ताट राहण्यास मदत होते. तसेच पाठीच्या कण्याच्या खालच्या भागावर जोर पडल्याने आराम तरी मिळतोच. याबरोबर तुम्हाला जोरात श्वास घेण्याची गरज भासत नाही. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
गुडघ्यांचा व्यायाम होतो
जमिनीवर बसून जेवण केल्याने संपूर्ण शरीराला आराम मिळतो. पचन क्रिया सुरळीत राहते. तसेच बसताना तुमच्या गुडघ्यांचा व्यायाम होतो. यामुळे गुडघ्यांचा त्रास होत नाही.
पचनक्रिया सुधारण्यास मदत होते
जमिनीवर बसून जेवताना प्रत्येक घासाला आपल्याला खाली झुकावं लागतं. यामुळे पोटाच्या मासपेशी कार्यरत राहतात. खाली झुकल्याने आपला व्यायाम तर होतोच शिवाय यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कारण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.
चिरतरुण राहता
जमिनीवर बसून जेवण करण्याने तुम्ही वृद्धावस्थेपासून दूर राहता. कारण सुखासनात बसून जेवण केल्याने मणका आणि पाठीच्या समस्या होत नाहीत. सुखासनात बसून जेवल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत.