उन्हाळ्यात शरीराला पाण्याची कमतरता भासते. अशावेळी थंड पाणी सतत प्यावसं वाटतं.मग प्रत्येकजण तहान भागवण्यासाठी थंड पाण्याच्या शोधात फ्रीजकडे जातो. पण फ्रीज मधील अतिगार पाणी शरीराला घटक ठरू शकते. पण आयुर्वेदानुसार माठातून पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. आयुर्वेदातही मातीच्या भांड्यात पाणी पिणे, अन्न शिजवणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे मानले गेले आहे..आज आपण माठातील पाणी पिण्याचे कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊयात.
माठातलं पाणी प्यायल्याने तुम्हाला टॉन्सिल्स, सर्दी यासारख्या समस्या होणार नाहीत. फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने घशात खाज सुटणे आणि खवखवण्याचा होऊ शकतो. पण मातीच्या मडक्यातील पाण्याचे तापमान घशासाठी सौम्य असते.
उष्माघातापासून संरक्षण मिळविण्यासाठी माठाचे पाणी पिणे फायद्याचे ठरते. शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. फ्रीजचे थोडेसे पाणी प्यायल्यानंतरही तहान पटकन भागते. माठाच्या पाण्यामुळे शरीराला अनेक खनिजे, जीवनसत्त्वे मिळतात. उन्हाळ्यात पोट खराब झाल्यास माठातल्या पाण्यामुळे आराम मिळतो.
माठाचे पाणी पोटाची उष्णता नैसर्गिक पद्धतीने थंड करते. मातीची भांडी नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असतात. त्यामुळे अपचन आणि गॅस्ट्रिकशी संबंधित समस्या दूर राहतात.
माठाचे पाणी प्यायल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते. खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता माठाचे पाणी प्यायल्यामुळे कमी होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









