जवळपास 21 कोटी रुपये ट्रान्स्फर करण्यात आले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता दिला आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये आयोजित करण्यात आलेल्या गरीब कल्याण संमेलनात माहिती दिली आहे. 10 कोटी पेक्षा अधिक शेतकऱयांच्या खात्यावर 21 हजार कोटी रुपये ट्रान्स्फर केले आहेत.
इ-केवायसी आवश्यक
शेतकऱयांना ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देण्याची गरज आहे. यामध्ये नेंदणीकृत मोबाईल नंबरच्या आधारे ओटीपीच्या मदतीने तपशील तपासता येतो.
असा तपासा तपशील
w पीएम किसान कार्यालयीन वेबसाईट https://pmkisan.gov.in
w होमपेजवर फार्मर्स कॉर्नरमध्ये बेनिफिशिअर स्टेटसवर क्लिक करा
w या ठिकाणी आधार नंबर व खाते नंबरसह मोबाईल नंबर द्यावा
w गेट डाटावर क्लिक करण्यात आल्यानंतर सर्व माहिती समोर येईल
w कोणत्याही मोबाईलवर पीएम किसान हे ऍप डाऊनलोड करावे.








