विनोद सावंत, कोल्हापूर
नवीन ई गर्व्हनन्स सिस्टीम सोमवारपासून कार्यन्वीत होत असल्याने महापालिकेची 20 वर्षापूर्वीची कालबाह्या झालेली संगणकीय यंत्रणा अखेर स्क्रॅप होणार आहे. यामुळे महापालिकेचा कारभार आता हायस्पीड होणार आहे. पाणीपट्टी, घरफाळ्यासाठी रांगेत उभारण्याची गरज लागणार नाही. मोबाईल अॅपमधून घरबसल्या पैसे जमा करता येणार आहे. विशेष म्हणजे विवाह नोंदणीसाठी वेटींग करण्याचीही गरज लागणार नाही. ऑनलाईननेच नोंदणी करणे शक्य होणार आहे.
कोल्हापूर महापालिकेची कॉम्प्युटर सिस्टिम कालबाह्य झाली आहे. संगणकीय कामकाजावर याचा परिणाम होत आहे. नागरिकांनाही कामासाठी महापालिकेत थांबून रहावे लागते. तसेच जुन्या सिस्टीममध्ये अनेक त्रुटी होत्या. यामुळेच सिस्टिम बदलण्यात आली. नवीन सिस्टिमचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे. कंपनीने शिवाजी मार्केट येथे डेटा सेंटर उभारले आहे. महत्वाच्या 14 विभागातील कामे पूर्ण केली असून या विभागातून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा ऑनलाईनने मिळणार आहे. महापालिकेच्या या सेवांसाठी मोबाईल अॅप तयार केले आहे. नागरिकांनी हे अॅप अपलोड केल्यानंतर घरबसल्या सर्व सेवा मिळणार आहेत. मनपा विषयी तक्रारीही ऑनलाईनने करणे शक्य होणार आहे.
सिस्टीम अॅक्टीव्हसाठी लागले अडीच वर्ष
एचसीएल कंपनीचा ठेका संपल्यानंतर नवीन ई गर्व्हनन्स सिस्टीम बसविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. ऑक्टोंबर 2020 मध्ये संबंधित कंपनीला वर्कऑर्डर दिली होती. कंपनीला काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदत असताना अडीच वर्ष झाले तरी सिस्टीम अॅक्टीव्ह झाली नव्हती. केवळ डेमोमध्ये सहा महिने गेले. अखेर ई गर्व्हनन्स सिस्टीमला मुहूर्त मिळाला आहे.
मनपाचे हे विभाग ऑनलाईन
विवाह नोंदणी, परवाना, विधी विभाग, अग्निशमन विभाग, टिपी, आवक-जावक
घरफाळा विभागाचे स्वतंत्र स्वॉफ्टवेअर
मनपाच्या घरफाळा विभागास राष्ट्रीयकृत बँकने सीएसआर फंडात स्वॉफ्टवेअर दिले आहे,. 27 जानेवारी रोजी संबंधित बँकेसोबत करार झाला आहे. 1 फेब्रुवारीपासून त्यांनी कामकाज सुरू केले आहे. सहा महिन्यांची त्यांना डेडलाईन दिली असली तरी मे अखेर सर्व स्वॉफ्टवेअर अपलोड होणार आहे.
ई गव्हर्नन्सचा ठेका-मोनार्च टेक्नॉलॉजी, पुणे
वर्कऑर्डर-ऑक्टोंबर 2020
कामाची मुदत -एक वर्ष
देखभाल दुरूस्तीची जबाबदारी -5 वर्ष
निधी -7 कोटी 50 लाख
नवीन ई गव्हर्नन्सचे फायदे
-महापालिकेची हॉस्पिटल होणार पेपरलेस
-शहरातील हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन ऑनलाईन
-मनपाच्या फायर फी घरबसल्या जमा करता येणार
-एटीएम सेंटरप्रमाणे उपनगरामध्ये 10 नागरी सुविधा केंद्र
-मोबाईल अॅपमुळे घरबसल्या पाणीपट्टी, घरफाळा जमा करण्याची सुविधा
-परवाना नुतनीकरण
-नागरिकांच्या तक्रारींच्या सध्यास्थिती एका क्लिकवर समजणार
-आपत्ती घडल्यास अॅपवरून अग्निशमन दलाला संदेश देता येणार
-ऑनलाईनने परवाना नुतनीकरण करता येणार
-आवक जावकमध्ये दिलेल्या तक्रारीचा सध्यस्थिती समजणार
-मनपाची वेबसाईट अद्ययावत
जुनी संगणकीय सिस्टीम जुनी झाली होती. त्यामुळे कामकाजावर परिणाम होत होता. नवीन ई गर्व्हनन्समुळे एका सर्व्हअरची क्षमता 4 जीबीवरून 196 जीबी रॅम होणार आहे. यामुळे संगणकीय कामकाज गतीने होणार आहे. या शिवाय सर्व सिस्टीम ऑनलाईन होणार असल्याने नागरिकांना घरबसल्या मनपाच्या सेवा मिळणार आहेत. 14 विभागातील काम पूर्ण झाले आहे.
यशपाल रजपूत, सिस्टीम मॅनेजर, महापालिका
Previous Articleकारिवडेत दशावतारी नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन !
Next Article स्मार्ट आळते गावची संकल्पना राबवा – धैर्यशील माने









