डॉक्टर स्ट्रेंज फेम अभिनेता, लस्सी सर्वात आवडती
डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेसचा स्टार बेनेडिक्ट कंबरबॅच भारतात खूप लोकप्रिय आहे. अभिनेता म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी त्याने अनेकदा भारताचा दौरा केला आहे. शर्लक आणि डॉक्टर स्ट्रेंच या भूमिकांसाठी तो ओळखला जातो.

किशोरवयीन असताना बेनेडिक्टने अनेक महिन्यांपर्यंत पश्चिम बंगालमधील एका तिबेटी मठात वास्तव्य केले होते. त्यानंतर तो उत्तर भारतात फिरला होता. भारतातील वास्तव्यादरम्यान तिबेटी चहामुळे मला एक वेगळय़ा प्रकारचा स्वाद मिळाला. त्यांचे डंपलिंग्स देखील अत्यंत पसंत आहेत. तिबेटी खाद्यपदार्थांवर मी मोठा ताव मारला आहे. मला लस्सी सर्वाधिक पसंत असल्याचे त्याने सांगितले आहे.
बेनेडिक्ट सध्या ऍडव्हेंचर कॉमेडी चित्रपट ‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर’चे चित्रिकरण करत आहे. यात तो टायटॅनिक ही भूमिका साकारत आहे. चित्रपट रोआल्ड डाहल यांच्या कहाणींवर आधारित आहे. चित्रपटात राल्फ फिएनेस, देव पटेल, बेन किंग्सले आणि रुपर्ट प्रेंड देखील दिसून येतील. हा चित्रपट चालू वर्षाच्या अखेरीस नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.









