वृत्तसंस्था/ चेन्नई
चेन्नई सुपर किंग्सचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने कर्णधार एम. एस धोनीची दुखापत चिंताजनक नसल्याचे सांगितले आहे, परंतु अष्टपैलू बेन स्टोक्स आणखी एक आठवडाभर मैदानाबाहेर राहील, असे त्याने स्पष्ट केले आहे. स्टोक्स या आयपीएल हंगामात ‘सीएसके’साठी फक्त पहिले दोनच सामने खेळलेला असून 8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविऊद्धच्या सामन्यात त्याच्या पायाच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो बाहेर पडला होता. स्टोक्सने आतापर्यंत चार सामने गमावले आहेत.
बेन स्टोक्सला दुखापतीचा धक्का बसला आहे आणि तो आठवडाभर बाहेर राहील, असे फ्लेमिंगने सांगितले आहे. मात्र धोनी पूर्णपणे ठीक आहे. तो त्याच्या दुखापतीची व्यवस्थित काळजी घेत आहे. त्यामुळे तो उपलब्ध राहणार आहे. तो नेहमी संघाला प्राधान्य देतो. दुखापतीमुळे आपण योगदान देऊ शकणार नाही असे त्याला वाटले असते, तर तो स्वत:च बाहेर बसला असता, असे फ्लेमिंगने यावेळी सांगितले.









