मौल्यवान वस्तूंसह पदके लंपास
वृत्तसंस्था/लंडन
इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातून मौल्यवान वस्तू, दागिने आणि पदके पळवून नेली आहेत. बेन स्टोक्सने ‘एक्स’ पोस्टद्वारे ही माहिती दिली. स्टोक्सने यासंबंधीचे काही फोटोही सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. आपण इंग्लंड संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर असताना 17 ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्या घरी चोरी झाल्याचे त्याने म्हटले आहे. माझी पत्नी आणि दोन लहान मुले घरी असताना ही चोरी झाल्याचे स्टोक्सने सांगितले. मात्र, ‘सुदैवाने कुटुंबातील कोणत्याही सदस्याला शारीरिक इजा झाली नाही हे चांगले’ असेही त्याने स्पष्ट पेले. तसेच चोरट्यांना पकडले जावे, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे.









