वृत्तसंस्था/ ह्युस्टन
रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील अमेरिकन खुल्या क्लेकोर्ट चॅम्पियनशिप टेनिस स्पर्धेत 21 वर्षीय बेन शेल्टनने अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात त्याने विद्यमान विजेत्या टायफोचा पराभव केला.
शेल्टनने अंतिम सामन्यात टायफोचे आव्हान 7-5, 4-6, 6-3 असे संपुष्टात आणताना 11 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. ही स्पर्धा जिंकणारा शेल्टन हा दुसऱ्या क्रमांकाचा तरुण टेनिसपटू आहे. यापूर्वी ब्रिटनच्या अॅण्डी रॉडिकने 2002 साली आपल्या वयाच्या 19 व्या वर्षी सदर स्पर्धा जिंकली होती. शेल्टन आणि टायफो यांचा हा अंतिम सामना 150 मिनिटे चालला होता.









