हॉलिवूड सपुरस्टार बेन एफ्लेकचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘द रिप’च्या प्रदर्शनाची आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. ‘द रिप’ हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
नेटफ्लिक्सच्या ऑफिशियल युट्यूब चॅनेलवर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यात प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 16 जानेवारी रोजी बेन एफ्लेकचा चित्रपट ‘द रिप’ नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. या चित्रपटात बेन एफ्लेकसोबत अभिनेमा मॅट डेमन देखील मुख्य भूमिकेत आहे. अन्य कलाकारांमध्ये स्टीवन येउह, तेयारा टेलर, ताशा कॅले सामील आहेत. तर चित्रपटाची कहाणी आणि दिग्दर्शन प्रसिद्ध निर्माता जो कार्नाहनने केले आहे. ‘बॉस लेवल’ आणि ‘द ग्रे’ यासारख्या आकर्षक चित्रपटांसाठी त्याला ओळखले जाते. चित्रपटात मियामी पोलीस विभागाच्या दोन अधिकाऱ्यांची कहाणी दाखविण्यात आली आहे. विभागाला नोटांनी भरलेले एक गोदाम मिळते. याच्या सुरक्षेसाठी दोन अधिकाऱ्यांना तेथे पाठविले जाते. शत्रूशी लढणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या भवती याची कहाणी फिरते.









