बेळगाव ः रामनाथ मंगल कार्यालय येथे भरविण्यात आलेल्या बेला बाजारची आज सांगता होत आहे महिलांना प्रामुख्याने गृहउद्योग करणाऱया महिलांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या हेतूने बेला बाजार भरविण्यात आला आहे.
यामध्ये 74 हून अधिक स्टॉल असून घरगुती, कार्यालयीन वापराच्या वस्तू तसेच सजावटीच्या वस्तू, दागिने यासह अन्य स्टॉल्स लावण्यात आले आहेत. शिवाय खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचे एक स्वतंत्र दालनही झाले आहे. बेळगावकरांनी बेला बाजारला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.









