खंडाळा :
गेल्या काही दिवसापासून शहरातील घंटागाड्या बंद असून दररोज जमा होणारा कचरा नक्की टाकायचा कुठे असा सवाल शहरवासीयांना पडला आहे. दरम्यान, प्रक्रीये अभावी कचरा डेपोतील समस्येबरोबर शहरातील कन्द्रयाचा प्रश्न केव्हा मिटणार असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
खंडाळा शहरातील स्वच्छतेसाठी नगरपंचायतकडून ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. दररोज, आठवडे बाजारातील जमा होणारा शहरामधील कचरा उचलण्याचे काम ठेकेदारांमार्फत केले जाते. शहरातून सकाळी कचरा गोळा करताना ध्वनीक्षेपकावरून नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत जागृती केली जाते. नागरिकांनी तसे न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असे सांगितले जाते.
मात्र गेली काही दिवसापासून शहरात कचरा गोळा करण्प्रया घंटागाड्या बंद असल्याचे दिसून येते. त्यामुळे दररोज जमा होणार कचरा नक्की टाकायचा कुठे असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.या समस्येवर नगरपंचायत प्रशासन याकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.
दरम्यान, शहरातील गोळा होणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या डेपोमध्ये खाली केल्या जातात. कचरा डेपोत जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते का ? असा सवाल उपस्थित होत आहे. तर दुसऱ्या बाजूला कद्रयाचे ढीग तयार झाल्याचे पहायला मिळतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत असल्याने तक्रारी वाढू लागल्या आहेत. तर सध्या शहरातील कचरा उचलन्याचे काम बंद असल्याने काही ठिकाणी अस्वच्छता दिसून येते. त्यावर नगरपंचायत प्रशासन लक्ष देणार का अशी चर्चा रंगत आहे.
- अस्वच्छ शौचालय !
नगरपंचायत हाद्दीत कचऱ्याची समस्या असताना ठेकेदाराकडून शहरातील सार्वजनिक शौचालयाची देखभाल सोयीनुसार होत असल्याने अस्वच्छ शौचालयाची स्वच्छता नियमित करण्यात यावी अशी मागणी होत आहे.








