वार्ताहर/किणये
बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन,बेळगुंदी शाळेच्या विद्यार्थ्यांनी राकसकोप येथे पार पडलेल्या 14 वर्षाखालील बेळगुंदी केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले. वैयक्तिक स्पर्धेमध्ये मयूर गावडाने 100 मी धावणे प्रथम, आरव बाळेकुंद्रीकर 200 मी धावणे,लांबउडी प्रथम,श्रेयस झुंगरूचे अडथळा शर्यत द्वितीय, 100 मी धावणे तृतीय क्रमांक,सोहम जाधव थाळीफेक व गोळाफेक प्रथम, समर्थ भास्कर थाळीफेक द्वितीय व गोळाफेक द्वितीय,श्रेयस झंगरूचे उंचउडी द्वितीय. सांघिक खेळ मुलांच्या रिले संघाने 4 बाय 100, थ्रो-बॉल प्रथम, खो-खो द्वितीय, वैयक्तिक मुलींच्या खेळामध्ये प्रेरणा पाटील अडथळा शर्यत,100 मी धावणे तृतीय, श्रद्धा बेळगावकर 400 मी. धावणे,तृतीय तर सांघिक मुलींच्या स्पर्धेमध्ये खो-खो प्रथम क्रमांक मिळविला. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव, संयोजक शंकर चौगुले, संचालक राजु मुजावर, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले तर संघ व्यवस्थापक सिद्धेश्वर तुर्केवाडकर आणि क्रीडाशिक्षक गोविंद गावडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.









