वार्ताहर /किणये
सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. मुलांच्या रिले संघाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघामध्ये मयूर गावडा, हर्षद हजगोळकर, आरव बाळेकुंद्री, श्रेयश झंगरूचे या खेळाडूंचा समावेश आहे. गोळाफेकमध्ये सोहम जाधव-प्रथम, बुद्धिबळ स्पर्धेत सृष्टी पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांना बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव, संयोजक शंकर चौगुले, राजू मुजावर, रेखा शहापूरकर, मंगल पाटील, संघ व्यवस्थापक सिद्धेश्वर तुर्केवाडकर यांचे प्रोत्साहन तर गोविंद गावडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.









