मुंबई / ऑनलाईन टीम
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेना खासदार संजय राऊत बेळगावला जाणार आहेतसंजय राऊत यांनी ट्विटरद्वारे याविषयी माहिती दिली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत हे येत्या १४ एप्रिलला बेळगावत शुभम शेळकेच्या प्रचारासाठी जाणार आहेत. याबाबत स्वत: संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. बेळगाव मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. या मतदारसंघात भाजपचे सुरेश अंगडी निवडून आले होते. परंतु त्यांचे निधन झाले. त्यानंतर आता हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केलेत. तर दुसरीकडे काँग्रेसनेही या मतदारसंघात उमेदवार उतरवला आहे. बेळगाव मतदारसंघात काँग्रेस, भाजप आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








