बेळगाव : पुणे येथे साउथ युनायटेड फुटबॉल अकादमी आयोजित एसयुएफसी चषक 9 वर्षाखालील मुलांच्या लीग कम नाकाऊट फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मॅजिक स्पोर्टिंग क्लब संघाने एम एम एस सी पुणे संघाला 3-2 अशा गोल वर्गाने पराभव करून एसयूएफसी चषक पटकाविला. पुणे येथे आयोजित या स्पर्धेत बेळगावच्या मॅजिक स्पोटिंग क्लबने भाग घेऊन यश संपादन केले आहे. पहिल्या सामन्यात मॅजिक स्पोर्टिंग संघाने एसयुएफसी संघाचा 11-0 असा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात आरव नेरर्लेकरने 4, शिवम पाटीलने 3, आयुष परमशेट्टीने 2, तर श्रीकृष्ण राठोड, वर्षभ रत्नोजी यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात मॅजिक स्पोटिंग संघाने अल्टरिना एफसी संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात आरव नेरर्लेकर, शिवम पाटील व रिहान मुचंडी यांनी गोल केले. तिसऱ्या सामन्यात मॅजिक स्पोटिंगने इनविक्टीस संघाला 6-0 याचा पराभव केला. या सामन्यात शिवम पाटीलने 3, आरव नेरर्लेकर, विराम भोईते व शाश्वत यांनी प्रत्येकी एक गोल केला. अंतिम सामन्यात मॅजिक स्पोटिंग संघाला एमएमएससी पुणे संघाने कडवी लढत दिली.
या सामन्यात मॅजिक स्पोटिंगने एमएमएससी पुणे संघाला 3-2 अशा निसटता पराभव केला. या सामन्यात 8 व 14 व्या मिनिटाला मॅजिक स्पोटिंगच्या शिवम पाटीलच्या पासवर आरव नेरर्लेकरने सलग दोन गोल करून 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण दुसऱ्या सत्रात 22 व 27 व्या मिनिटाला पुण्याच्या संकेतच्या पासवर रोशनने दोन गोल करून 2-2 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. खेळ संपण्यास काही मिनिटे बाकी असताना आरव नेरर्लेकर च्या पासवर शिवम पाटीलने गोल करून 3-2 अशी महत्वाची आघाडी मिळवून दिली. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मॅजिक स्पोटिंग क्लब बेळगाव व उपविजेत्या एमएमएससी पुणे संघाला आकर्षक चषक, सर्व खेळाडूंना पदके प्रमाणपत्र देऊन कौतुक केले. अरव नेरर्लेकरला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. या संघात आयुष परमशेट्टी, आरव नेरर्लेकर, शुभम पाटील, श्रीकृष्णा राठोड, शाश्वत, वृषभ रत्नोजी, विराम भोईटे, रिहान मुचंडी या आधी खेळाडूंचा समावेश आहे. या संघाला ओजस तेरणी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे.









