बेळगाव जिल्हा क्रीडा युवजन खात्याचे शिवमणी, भव्यश्री यांना सुवर्ण, कल्लोळअप्पा बंडीबड्डरला रौप्य पदक
बेळगाव : बेंगळूर येथे चौथ्या राष्ट्रीय भालाफेक दिवसाच्या औचित्य साधुन कर्नाटक अॅथलेटिक संघटना आयोजित विविध गटात भालाफेक स्पर्धेत बेळगावच्या डीवायएसच्या खेळाडूने दोन सुवर्ण एक रौप्य पटकावित यश संपादन केले आहे. बेंगळूर येथे कंटिरीवा स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय भालाफेक दिवसाच्या औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील विविध जिह्यातून शंभरहून अधिक भालाफेक पटूनी सहभाग घेतला होता.
त्यामध्ये खुल्या गटात बेळगावच्या डीवायईएसच्या सी शिवमणीने 50.53 इतका भालाफेक करत सुवर्णपदक पटकाविले. 20 वर्षाखालील गटात बेळगावच्या शिवमने 64.56 इतका फेककरून सुवर्णपदक, डीवायएसच्या कल्लोळअप्पा बंडीबड्डरने 63.84 इतकी फेक करून रेप्य पदक फटकाविले. तर मुलींच्या गटात 18 वर्षाखालील गटात डीवायएसच्या भव्यश्री सीकेने 43.86 इतकी फेककरून सुवर्णपदक पटकाविले. तर बेळगावच्या गायत्री कदमने 40.42 इतकी फेक करून कास्य पदक पटकाविले. भालाफेक पटूंना अॅथलेटिक प्रशिक्षक संजीवकुमार नाईक, फिटनेस प्रशिक्षक बसवराज भुषण्णवर यांचे मार्गदर्शन. युवजन क्रीडाधिकारी बी श्रीनिवास यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









