प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावची कन्या मृणालिनी आर. बाळेकुंद्री-रायचूर यांची एअरफोर्समध्ये विंग कमांडर म्हणून निवड करण्यात आली आहे. सध्या त्या मुंबई येथील एअरफोर्समध्ये सेवा बजावत आहेत.
कॅम्प येथील सेंट जोसेफ येथे माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी हैद्राबाद आयएएफमधून वैमानिक प्रशिक्षण घेतले. बेळगाव येथील अरविंद व निवेदिता बाळेकुंद्री यांच्या त्या कन्या आहेत.









