मुलांच्या गटात बेळगावचा बागलकोटवर मात तर मुलींच्या गटात म्हैसूर संघाचा पराभव
बेळगाव : उडपी येथे कर्नाटक राज्य ऑलिम्पिक खो-खो स्पर्धेत बेळगावच्या मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात बागलकोट संघाचा 8 गड्यांनी तर मुलींच्या संघाने म्हैसूर संघाचा 10 गड्यांनी पराभव करुन विजेतेपदासह दुहेरी मुकुट पटकाविले. मंगळूर येथे सुरू असलेल्या मिनी ऑलिम्पिक खो-खो स्पर्धेत मुलांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगाव संघाने धारवाड संघाचा 2 गडी राखून विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात रोहीत, दक्ष, किशोर व यश यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत संघाला अंतिम फेरीत नेण्याचा सिंहाचा वाटा होता. मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगावने रायचूरचा एकतर्फी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात संध्या, स्नेहा, निकीता, वैष्णवी यांनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवून संघाला अंतिम फेरीत नेले.
मुलांच्या अंतिम सामन्यात बेळगाव संघाने बागलकोट संघाचा 25-17 असा एकूण 8 गड्यांनी पराभव करुन विजेतेपद पटकाविले. या सामन्यात रोहीत, दक्ष, किशोर व यश या चार खेळाडूंनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करुन संघाला विजय मिळवून देण्यास सिंहाचा वाटा उचलला. मुलींच्या अंतिम सामन्यात 27-17 एकूण 10 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात निकीता, संध्या, स्नेहा व वैष्णवी यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन घडविले. या दोन्ही संघातील खेळाडूंनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावित बेळगावचे नाव पूर्वीप्रमाणे खो-खोमध्ये उंचावले. मुलांच्या संघात रोहीत, किशोर, दक्ष, नागेश, तानाजी, गौतम, ऋतिक, कार्तिक, समर्थ, कमलेश, यश, रोहन, कार्तिक कडेमनी, आकाश व विनायक आदी खेळाडूंचा समावेश आहे. तर मुलींच्या संघात निकीता, श्रेया, ऋतुजा, नेहा, गौतमी, ऐश्वर्या, संध्या, साक्षी, सरिता, तन्वी, स्नेहा, वैष्णवी, अपेक्षा व लक्ष्मी आदी खेळाडूंचा समावेश आहे. या दोन्ही संघांना खो-खो प्रशिक्षक एन. आर. पाटील, अशोक बुद्धी, श्रीधर बेन्नाळकर, प्रदीप भांदुर्गे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.









