राजू दोडडणणवर चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : आनंद क्रिकेट कोचिंग अकादमी आयोजित रमेश दो•ण्णवर चषक 12 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेला सामन्यातून साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने मॅक्स क्रिकेट क्लबचा 9 गड्यांनी तर बेळगाव वॉरियर्सने दळवी थंडरचा 5 गड्यांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळवले. श्लोक छडीचाल व साईराज पोरवाल यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भगवान महावीर मैदानावर रमेश दो•ण्णवर चषक 12 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात दळवी थंडर्सने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडी बाद 94 धावा केल्या. त्यात आरती कदमने 4 चौकारांसह नाबाद 22, जीवा बी.जी. ने 3 चौकारासह 16 धावा केल्या. बेळगाव वॉरियर्स तर्फे श्लोक चडीचालने 8 धावात 5, श्रीजीतने 2 गडी बाद केले, प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव वॉरियर संघाने 21.3 षटकात 5 गडी बाद 98 धावा करून धावा करून सामना पाच गड्याने जिंकला. त्यात ओजस गडकरीने 8 चौकारांसह नाबाद 44, आऊषने नाबाद 10 धावा केल्या. दळवी तर्फे जीयान सलीमवाले व आरती कदम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात मॅक्स क्रिकेट क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकात सर्व गडी बाद 57 धावा केल्या. त्यात श्रवण पाटीलने 2 चौकारासह 14 धावा केल्या. साई फॉर्म तर्फे विश्रुत कुंदरनाडने 12 धावात 3, दिगंत वालीने 8 धावा 2 तर साईराज पोरवाल व अवनीश मालदकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई फ्रॉम संघाने 8.1 षटकात एक गडी बाद 58 धावा करून सामना 9 गड्याने जिंकला. त्यात साईराज पोरवालने 3 चौकारांसह 18, स्मितराज पोरवालने नाबाद 10 धावा केल्या. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सामनावीर श्लोक चडीचाल व साईराज पोरवाल तर इम्पॅक्ट खेळाडू ओजस गडकरी व श्रवण पाटील याना चषक देऊन गौरविण्यात आले.









