कुद्रेमनी / प्रतिनिधी : परतीच्या पावसाने कुद्रेमनी परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाला इतका जोर होता की कुद्रेमानी फाट्याजवळ असलेल्या पुलावर गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे बेळगाव वेंगुला रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. यामुळे बेळगावहून जाणाऱ्या वाहनांची आणि चंदगडहून बेळगावला येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसाने सर्वांची दाणादाण उडवून सोडली. गुरुवारी दुपारी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने अधिक जोर धरला. बघता बघता सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









