बैलहोंगल: दोन कार अमोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील इंचल गावानजीक घडली आहे.मंगल महांतेश भरमनायकर (वय ५०) रा. लद्दीगड्डी, ता.बैलहोंगल, कार चालक श्रीशैल सिद्धनगौडा नागनगौडर (वय ८७) रा. संपगांव अशी मृतांची ओळख पटली आहे. या घटनेत रायनायक भरमनायकर (वय ८७), गंगव्वा रायनायक भरमनायकर (वय ८०), मंजुळा श्रीशैल नागनगौडर (वय ३०), सुभानी लालसाब वककुंद (वय २८) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगाव शहरातील खासगी इस्पितळात उपचार सुरु आहेत. हे सर्व वास्तू शांती निमित्त कपडे खरेदी करण्यासाठी गोकाक तालुक्यातील कोण्णूरला जात होते अशी माहिती मिळाली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









