मुला-मुलींचा संघ अंतिम फेरीत : यादगिरी, बागलकोटशी लढत
बेळगाव : म्हैसूर येथे युवजन क्रीडा खाते व युवा सबलीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा महोत्सवानिमित्त सीएम चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत उपांत्यफेरीत बेळगावच्या मुलींच्या संघाने बेंगळूर संघाचा तर मुलांच्या बेळगाव संघाने रायचूर संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. म्हैसूर येथे सुरू असलेल्या सीएम चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुलांच्या विभागात बेळगाव जिल्हासंघाने उपांत्यफेरीच्या सामन्यात रायचूर संघाचा 3 गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. बेळगावतर्फे अक्षय, यश व नंदेश यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून बेळगावला अंतिम फेरीत पोहोचविण्याचा सिंहाचा वाटा होता. रायचूरला पराभव करण्यास सोपे झाले. बेळगावचा अंतिम सामना गतवर्षेच उपविजेता यादगिरी तुल्यबळ संघाशी गुरूवारी खेळविण्यात येणार आहे. मुलींच्या गटात घेण्यात आलेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने बेंगळूर संघाचा 4 गुणानी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. या सामन्यात प्रणाली बिजगरकर, रक्षीता कंग्राळकर व सानिका गोरल यांनी उत्कृष्ट खेळाचे खेळ करीत रनिंग करतेवेळी 3 मिनीटाचा वेळ पूर्ण केला. तर सानिका चिट्टीने व निकिता यानी या सामन्यात प्रत्येकी 2 गडी टिपले. बेळगाव जिल्हा संघाचा अंतिम सामना बागलकोट जिल्ह्याशी गुरूवारी खेळविण्यात येणार आहे. या दोन्ही संघाना खो-खो एन. आर. पाटील, नितीन नाईक, एम. एन. सिध्दानी यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभत आहे.









