आजपासून प्रारंभ : कार्यकर्त्यांकडून गेल्या आठ-दहा दिवसांपासून जनजागृती : कोरोनामुक्तमुळे दौड जल्लोषात काढण्याचा निर्णय
वार्ताहर /किणये
तालुक्यात सोमवार दि. 26 सप्टेंबरपासून दुर्गामाता दौडला प्रारंभ होणार आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून कार्यकर्त्यांनी गावागावांमध्ये बैठका घेऊन दुर्गामाता दौड संदर्भात जनजागृती केली आहे. गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या संकटामुळे दुर्गामाता दौड शहर व ग्रामीण भागात साध्या पद्धतीने झाली. यंदा कोरोनाचे संकट टळल्यामुळे दौड जल्लोषात काढण्याचा निर्णय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
अनेक गावांतील मंदिरांमध्ये बैठका घेऊन दौडचा मार्ग निश्चित केला आहे. गल्ल्यांमध्ये साफसफाई केली असून रविवारी दुपारपासूनच भगव्या पताका लावताना कार्यकर्ते दिसून येत होते.
बेळगुंदी विभाग-शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दुर्गामाता दौडचे आयोजन क्sढढले आहे. बेळगुंदी विभागातर्फे ठरविलेल्या गावागावांमध्ये दौड काढण्यात येणार आहे. यामध्ये 28 रोजी राकसकोप, 29 रोजी सोनोली, 30 रोजी यळेबैल, 1 रोजी बेळगुंदी व त्यानंतर इतर गावांमध्ये दौड होणार आहे.
बेनकनहळ्ळी विभाग-सोमवारी या भागातील प्रत्येक गावामध्ये त्या त्या गावांतील कार्यकर्त्यांतर्फे दौड होणार आहे. दि. 27 रोजी आर्मी क्वॉर्टर्स कॉलेज समोरून दौड येणार आहे. दि. 28 रोजी गणेशपूर, गुरुवार दि. 29 रोजी क्रांतीनगर, दि. 30 रोजी बेनकनहळ्ळी, दि. 2 रोजी हंगरगा, दि. 3 रोजी सावगाव, दि. 4 रोजी मंडोळी येथे दौड काढण्यात येणार आहे.
मच्छे विभागातर्फे दि. 26 रोजी ब्रह्मलिंग मंदिर येथून दुर्गामाता दौडला सुरुवात होणार आहे. महादेव गल्लीमार्गे गावातील सर्व मंदिरांना भेट देऊन लक्ष्मी गल्लीजवळील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर दौडची सांगता होणार आहे. दि. 27 रोजी बेळगावकर गल्ली, श्रीहरी नगर, हावळनगर, गंगा गल्ली येऊन मारुती गल्ली येथील दुर्गामाता मंदिर येथे सांगता होणार आहे. याबद्दलचे माहितीपत्रक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मच्छेतर्फे सर्वांना विविध माध्यमांतून पाठविण्यात आले आहे.
दि. 28 रोजी संपूर्ण शिवशक्तीनगर, श्री दुर्गामाता लोहार गल्ली, गंगानगर येथे सांगता. दि. 29 रोजी नेहरूनगर, हनुमाननगर 1 ला क्रॉस, 2 रा क्रॉस, 3 रा क्रॉस, निलकंठेश्वरनगर, भैरवनगर येथे सांगता. 30 रोजी ओंकारनगर, हनुमान टी स्टॉल, लाडनगर, गोडसे कॉलनी 1 ला क्रॉस, 2 रा क्रॉस, नावगेकरनगर 1 ला क्रॉस, 2 रा क्रॉस, दत्तनगर येथे सांगता.
01 ऑक्टोबर श्री ब्रह्मलिंगनगर, जय मल्हारनगर, संपूर्ण लक्ष्मीनगर, चौगुलेनगर 1 ला क्रॉस, 2 रा क्रॉस, मरगाई गल्ली येथे सांगता. दि. 02 रोजी आनंद गल्ली (वरचा भाग), संपूर्ण भारतनगर, शिंदे कॉलनी, नगर 2 रा क्रॉस, 1 ला क्रॉस, श्री मारुती मंदिर श्री नगर 1 ला क्रॉस येथे सांगता, दि. 03 रोजी हावळनगर 5 वा क्रॉस, 4 था क्रॉस, 3 रा क्रॉस, छत्रपती श्री शिवाजी महाराजनगर, हावळनगर येथे सांगता. दि. 04 रोजी संपूर्ण धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजनगर, संपूर्ण स्वामीनगर, श्री श्वेतार्क गणेश मंदिर, स्वामी नगर व शेवटच्या दिवशी बुधवार दि. 05 रोजी श्री ब्रह्मलिंग मंदिरापासून महादेव गल्लीमार्गे गावातील सर्व मंदिरे, ग्राम दैवत श्री लक्ष्मी माता मंदिर, लक्ष्मी गल्ली येथे सांगता होणार आहे.
येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सोमवारी पहाटे 5.30 वाजता ब्रह्मनगर येथील मारुती मंदिर येथून दौडला सुरुवात होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दौड आल्यानंतर शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. सिद्धेश्वर गल्ली पहिला, दुसरा आणि तिसरा क्रॉस या मार्गाने जाऊन दुर्गामाता मंदिर येथे पहिल्या दिवशीच्या दौडची सांगता होईल.
दि. 27 रोजी सिद्धेश्वर गल्ली दुर्गादेवी मंदिर येथून सुरुवात तर दि. 28 रोजी मारुती नगर येथील मारुती मंदिर, दि. 29 रोजी जनता प्लॉट येथील मारुती मंदिर, दि. 30 रोजी स्मशानभूमीजवळील शिवमंदिर, दि. 1 रोजी रामदेव गल्लीतील बिरदेव मंदिर, दि. 2 रोजी रामदेव गल्लीतील श्रीराम मंदिर, दि. 3 रोजी विद्यानगर दुर्गादेवी मंदिर, दि. 4 रोजी सिद्धेश्वर मंदिर येथून दौडीला सुरुवात होणार आहे. सर्व शिवभक्तांनी दौडमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
हुंचेनहट्टी विभाग-या विभागातर्फे आयोजित दुर्गामाता दौडची सोमवार दि. 26 रोजी नावगे येथून सुरुवात होणार आहे. दि. 27 रोजी बामणवाडी, दि. 28 रोजी कुट्टलवाडी, 29 रोजी बाळगमट्टी, 30 रोजी हुंचेनहट्टी, 1 रोजी रामेश्वर नगर ते जयनगर दौड काढण्यात येणार आहे.
वाघवडे-सोमवारी पहाटे 5.30 वाजता वाघवडे येथील छ. शिवाजी महाराज चौक येथून दौडला सुरुवात होणार आहे. याप्रमाणे गावात नवरात्रोत्सवात दररोज दौड काढण्यात येणार आहे.
उचगावमध्ये आजपासून दुर्गामाता दौड

धारकऱयांसह युवकांना मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सोमवार दि. 26 सप्टेंबरपासून घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर दुर्गामाता दौडला प्रारंभ होणार आहे. यासंदर्भात गावातील युवकांची बैठक गांधी चौकातील मध्यवर्ती गणेश विठ्ठल-रखुमाई मंदिरात पार पडली. अध्यक्षस्थानी उचगाव प्रमुख नेहाल जाधव होते.
यंदाही दुर्गामाता दौड भव्य स्वरुपात काढण्यासाठी युवक एकत्र आले आहेत. यावषी कोरोनामुक्त दुर्गामाता दौड असल्याने युवकांची उपस्थिती मोठय़ा प्रमाणात राहणार असल्याचे बैठकीमध्ये चर्चेअंती दिसून आले. दौडची परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी यावषी धारकरी, युवकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना करून दौडीचा मार्ग, सुरक्षित अंतर अशा विविध सूचना यावेळी केल्या. नेहाल जाधव व अक्षय अष्टेकर यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
दौडमध्ये गावातील सर्व युवकांनी सहभाग घ्यावा आणि शांततेने दौड यशस्वी करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. उचगाव परिसरातील जवळपास सर्वच गावांमधून या दौडचे आयोजन केले आहे. ध्वजाचे मानकरी प्रत्येक गल्लीसाठी ठरविण्यात आले. तसेच पालखी सोहळाही होणार आहे. बैठकीमध्ये 32 मण सुवर्णसिंहासन, खडा पहारा, नोंदणी तसेच सर्व धारकऱयांनी पांढरा कुर्ता, टोपी परिधान करण्यास सांगण्यात आले. दौड रोज सकाळी सहा ते सात या वेळेत असेल. 5 ऑक्टोबरपर्यंत दौड सुरू राहील.
यावेळी मिथील जाधव, यल्लापा पाटील, महेश देसाई, प्रज्वल गोंधळी, अमोल जाधव, ओमकार कोवाडकर, राहुल पावशे, साई पावशे, बाबू बोकडे, महेश हावळे, आकाश हावळे, प्रियेस पावशे, अभय कल्लेहोळकर, महेश आनंदाचे, उदय कदम, यशवंत तरळे, श्रीहरी होनगेकर, ओमकार मण्णूरकर उपस्थित होते.









