मास्टर्स जलतरण स्पर्धेत 17 पदकांची लयलूट
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळूर येथे विजयनगर अॅक्वेटिक सेंटर आयोजित राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरियस क्लबच्या मास्टर्स जलतरणपटूंनी 6 सुवर्ण, 9 रौप्य व 2 कांस्यपदकांसह 17 पदकांची कमाई करत घवघवीत यश संपादन केले आहे.
बेंगळूर येथील विजयनगर अॅक्वेटिक सेंटरच्या जलतरण तलावात घेण्यात आलेल्या मास्टर्स जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरियस क्लबच्या नताशा आजगावरकरने 2 सुवर्ण, 3 रौप्यपदक, मिनल पाटीलने 2 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्यपदक, रिदम त्यागीने 1 सुवर्ण, 3 रौप्य, 1 कांस्यपदक पटकाविले. तर अजय आचार्यने 1 सुवर्ण, 2 रौप्यपदक पटकाविले. या सर्व जलतरणपटूंना जलतरण प्रशिक्षक उमेश कलगटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर व गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.









