सावली केअर सेंटरतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजन : दिशा, वेदा, सार्थकचा बेस्ट परफॉर्मर ऑफ दि कॉम्पिटिशन या बहुमानाने गौरव
कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी 8 जुलै रोजी मार्सेलीस मारलेल्या उडीच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर चषक जलतरण स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात बेळगावमधील आबा क्लबच्या दिशा होंडीने तर 14 वर्षाखालील मुलींच्या गटात वेदा खानोलकरने अफलातून कामगिरी करत प्रत्येकी 8 सुवर्ण पदकांची कमाई केली. तसेच 12 वर्षाखालील गटात बेळगावमधील स्विमर्स क्लबच्या सार्थक श्रेयेकरनेही 8 सुवर्ण पदकांवर कब्जा केला. या उत्तुंग कामगिरीबद्दल दिशा, वेदा व सार्थक या तिघांनाही ‘बेस्ट परफॉर्मर ऑफ दि कॉम्पिटिशन’ या बहुमानाने गौरव करण्यात आला. सावली केअर सेंटरच्यावतीने कुऊकली (ता. राधानगरी) येथील भोगावती महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू जलतरण तलावात येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 8, 10, 12, 14 व 17 अशा पाच वयोगटातून 175 मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. यापैकी 8 व 10 वर्षाखालील मुला-मुलींनी 50 मी. तर 12, 14 व 17 वयोगटातील मुला-मुलींनी 50 व 100 मी. फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय या प्रकारातून स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. चौगुले यांच्या हस्ते उद्घाटन केले. यावेळी सावली सेंटरचे विश्वस्त महेश धर्माधिकारी यांनी सावरकरांकडून मार्सेलीस येथे मारलेल्या उडीची माहिती सांगितली. यावेळी संचालक गौरी देशपांडे उपस्थित होत्या.
यानंतर सुऊ केलेल्या स्पर्धेतील 17 वर्षाखालील मुलींच्या गटात कोल्हापुरातील सागर पाटील जलतरण तलावाच्या कृष्णा शेळकेने 7 सुवर्ण व 1 रौप्यपदक जिंकले. तसेच मुलांच्या गटात बेळगावच्या आबा क्लबच्या स्वऊप धनुचेने 6 सुवर्णपदके पटकावली. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात बेळगावमधील स्विमर्स क्लबच्या आदी शिरसाटने 4 सुवर्ण व 2 रौप्य आणि 10 वर्षाखालील मुलांच्या गटात बेळगावच्याच आभा क्लबच्या वर्धन नगबीने व सागर पाटील जलतरण तलावाच्या महेंद्र सरनोबत यांनी प्रत्येकी 2 सुवर्णपदके पटकावली. याचबरोबर 8 वर्षाखालील मुलींच्या गटात बेळगावमधील स्विमर्स क्लबच्या पाखी हलगेकरने 4 सुवर्ण आणि कुरुकलीमधील राजर्षी शाहू जलतरण तलावाच्या विघ्नेश बर्गेने 1 सुवर्ण व 1 कांस्य पटकावले. बक्षीस वितरण समारंभात स्पर्धेतील सर्व यशस्वी जलतरणपटूंना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरवले. सावली केअर सेंटरचे अध्यक्ष किशोर देशपांडे, विश्वस्त प्रकाश मेहता, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव, सुरेश सुतार यांच्या हस्ते जलतरणपटूंनी बक्षीसे स्वीकारली. कोल्हापूर जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अजय पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू जलतरण तलावाचे व्यवस्थापक बाजीराव बरगे आणि अजित पाटील यांच्यासह सावलीचे मंजिरी देवाणावर, शिवानंद पुयम, कुणाल सरावणे, योगेश चव्हाण, सौरभ शेळके, स्वप्नील ठोंबरे, संयम कळस्कर, चेतन वाघ, स्वयम सुतार, ओंकार देवधर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.









