बेळगाव : मराठा युवक संघ आयोजित 58 वी मानांची बेळगाव श्री शरीरसौष्ठव स्पर्धा 31 मार्च रोजी आयोजित येणार आहे, असा निर्णय मराठा युवक संघाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब काकतकर होते. गेली 57 वर्षे मराठा युवक संघातर्फे भव्य आंतरराज्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही सदर स्पर्धा 31 मार्च रोजी घेण्यात येणार असून यावेळी बेळगाव श्री व मि. हर्क्युलस या स्पर्धा घेण्यात येणार आहे. कर्नाटक, गोवा, कोल्हापूर येथील स्पर्धका या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा मराठा मंडळच्या सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. आयबीबीएफ मुंबई व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धा होणार आहे, अशी माहिती बाळासाहेब काकतकर यांनी दिली. या बैठकीत सचिव चंद्रकांत गुंडकल, उपाध्यक्ष मारुती देवगेकर, रघुनाथ बांडगी, नेताजी जाधव, लक्ष्मण होनगेकर, मोहन बेळगुंदकर, सुहास किल्लेकर, राजाराम मजुकर, अजित सिद्धण्णावर, हेमंत हावळ, बसवराज अरळीमठ्ठी व सुनील राऊत उपस्थित होते.
Previous Articleएसआरएस हिंदुस्थानकडे आरजीपीएल चषक
Next Article लोकमान्य चषक फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचे अनावरण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









