केएससीए ए डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए ए डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ ने बीडीके हुबळी सी संघाचा 7 गड्यांनी पराभव करुन 4 गुण मिळविले. करण बोकडेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससीए बेळगाव मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन सी हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20.3 षटकात सर्व गडी बाद केवळ 46 धावा केल्या. त्यांचा मकवाना अहमदने 3 चौकारांसह 22 तर आकाश कुलकर्णीने 10 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे करण बोकडेने 30 धावात 4, हर्ष पटेलने 0 धावात 3 गडी बाद करत हॅट्ट्रीक नोंदविली. तर सिद्धेश असलकरने 0 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 7.2 षटकात 3 गडी बाद 47 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात सुदीप सातेरीने 2 चौकारांसह 12, आर्यन कुंदप व विजय पाटील यांनी नाबाद 10 धावा केल्या. बीडीकेतर्फे आदित्यरावने 29 धावात 2 तर दऱ्यांप्पा दानगेरने 1 गडी बाद केला.









