के एस सी ए सेकंड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए सेकंड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यातून बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने आनंद अकादमीचा 5 गड्यांनी तर हुबळी स्पोर्ट्स क्लबने टॅलेंट्स स्पोर्ट्स क्लबचा पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळवले. तरुण हिरेमठ व केतज कोल्हापूरे यांना पुरस्कार देण्यात आला. ऑटो नगर येथील केएससीए मैदानावरती खेळण्यात आलेला पहिल्या सामन्यात आनंद क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 40.2 षटकात सर्व गडी बाद 150 धावा केल्या. त्यात केतज कोल्हापूरेने 6 चौकारांसह 45, आदित्य कलपत्रीने 6 चौकारांसह 33, नंदकुमार मलतवाडकरने 2 षटकार एक चौकारासह 24, आदित्य पाटीलने 14, तर तनुस धुमाळीने 12 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लब तर्फे ध्रुव देसाईने 35 धावात 3, आकाश असलकरने 2, तर आदित्य वारंग व बाबू कदम, प्रथमेश मास्तमरर्डी, शिवम नेसरीकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला, प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 28.2 षटकात 5 गडीबाद 153 धावा करून सामना पाच गड्याने जिंकला.
त्यात आशुतोष हिरेमठने एक षटकार 5 चौकारांसह नाबाद 51, शिवम नेसरीकरने 2 षटकार 4 चौकाŒंसह नाबाद 42, अर्णव मुगानटीने 16, केदार उसुलकर व आदित्य वारंग यांनी प्रत्येकी 14 तर साई कारेकरने 11 धावा केल्या, आनंद तर्फे केतज कोल्हापूरेने 47 धावात 5 गडी बाद केले. हुबळी येंथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात टॅलेंट स्पोर्ट्स हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 42.4 षटकात सर्व गडी बाद 142 धावा केल्या, त्यात रवी कुमार एसने 36, वेदांत देसाईने 30, प्रवीण व अझरुद्दीन यांनी प्रत्येकी 17 तर जराप्पाने 19 धावा केल्या. हुबळी स्पोर्ट्स तर्फे तरुण हिरेमठने 46 धावांत 4, ध्रुव एस.ने 18 धावात 3, माधव दरवंदरने 13 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तर दाखल खेळताना हुबळी स्पोर्ट क्लब ब ने 15.1 षटकात 6 गडीबाद 146 धावा करून सामना चार गड्यांनी जिंकला त्यात ध्रुव नाईकने 3 षटकार 6 चौकारांसह 46, मदन मोहन के.ने नाबाद 31, वीरेंद्र सम्राणीने 30 धावा, नितीन दो•मणीने 19 तर साईने 10 धावा केल्या, टॅलेंट तर्फे रवी कुमार व प्रीतम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.









