विश्रुत चषक 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित विश्रुत चिट प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत विश्रुत चषक क्रिकेट स्पर्धेत झालेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब, आनंद अकादमी, एडिफाय व एसकेई संघांनी विजय मिळवित प्रत्येकी दोन गुण मिळविले. आरूष पुत्रन, अद्वैत चव्हाण, धनराज पिल्ले, समर्थ कोकणे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने सीसीआय संघाचा 113 धावांनी पराभव केला. बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 25 षटकात 3 बाद 195 धावा केल्या. कर्णधार आरुष पुत्रणने 13 चौकारांसह नाबाद 92, लक्ष खतयतने 46 धावा केल्या. सीसीआयतर्फे वरदराज पाटीलने दोन गडी बाद केले. उत्तरादाखल सीसीआय संघ 14 षटकात 82 धावांत गारद झाला. कनिष्क बेनकट्टीने 17 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे अवनीश बसुर्तेकरने चार गडी बाद केले. आरुष पुत्रण सामनावीर ठरला.
दुसऱया सामन्यात आनंद अकादमी संघाने युनियन जिमखाना संघाचा 9 गडय़ांनी पराभव केला. युनियन जिमखाना संघाने 25 षटकात 6 बाद 120 धावा केल्या. अतिथी भोगनने 31, अद्वैत पाटील व मोहम्मद हमजा यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या. आनंद संघातर्फे अद्वैत चव्हाणने 3 तर अथर्व करडीने 2 गडी बाद केले. उत्तरादाखल आनंद अकादमी संघाने 20.3 षटकात एक बाद 121 धावा केल्या. अद्वैत चव्हाणने 45, अमर पटवेगारने 34 धावा केल्या. जिमखानातर्फे सुरज सक्रीने एक गडी बाद केला. अद्वैत चव्हाण सामनावीर ठरला.
तिसऱया सामन्यात एडिफाय संघाने अर्जुन स्पोर्ट्स संघाचा 30 धावांनी पराभव केला. एडिफाय संघाने 25 षटकात 5 बाद 132 धावा केल्या. धनराज पिल्लेने 23, कौस्तुभ पाटीलने 19, प्रीतमने 13 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे रोहन पसन्नावरने 2 तर विश्रुत कुंदरनाड व गौरव गावडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल अर्जुन स्पोर्ट्स संघाने सर्व बाद 102 धावा केल्या. निखिल राठोडने 14 धावा केल्या. एडिफायतर्फे अंशुमन पुरोहित, कौस्तुभ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. धनराज पिल्ले सामनावीर ठरला.
चौथ्या सामन्यात एसकेई संघाने निना स्पोर्ट्स संघाचा 126 धावांनी पराभव केला. एसकेई संघाने 25 षटकात 6 बाद 158 धावा केल्या. समर्थ कोकणेने 50, सचिन तलवारने 38 धावा केल्या. निना स्पोर्ट्सतर्फे समर्थ चौगुले, जियान फराज काझी व सिद्धांत यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल निना स्पोर्ट्स संघाचा डाव फक्त 32 धावात आटोपला. एसकेईतर्फे वेदांत पाटीलने 3, दक्ष बुगडे व प्रणील बाळेकुंद्री यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. समर्थ कोकणे सामनावीर ठरला.









