बेळगाव उत्तरचे काँग्रेस उमेदवार आसिफ (राजू) सेठ यांनी श्रीनगर परिसरात आपल्या प्रचाराला सुरुवात केली. नागरिकांच्या घरोघरी जाऊन काँग्रेसला मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले आणि जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.
याप्रसंगी विविध संघटना, महिला मंडळांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शविला.
येथील नागरिकांच्या समस्या निवारण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांच्या या प्रचारकार्याला जनतेकडून चांगला पाठिंबा मिळत आहे.











