बेळगाव: मूळचे कोनवाळ गल्ली, सध्या रा. गणेशपूर येथील रहिवासी प्रतीक प्रकाश शिरोळकर (वय वर्षे २९) यांनी गुरुवारी रात्री गणेशपूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एक महिन्यापूर्वीच प्रतीकचे लग्न झाले होते. प्रतीक आर्किटेक्ट होता.
प्रतीक हा बेळगाव शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांचा चिरंजीव होत. या घटनेची नोंद कॅम्प पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
यांच्या पश्चात पत्नी, आई.वडील,बहीण,भाऊ असा मोठा परिवार आहे. शुक्रवारी दुपारी राहत्या घरातून सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्ययात्रा निघणार आहे.