बेळगाव – बेळगावच्या १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला गुजरातला नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बेळगावच्या के एच कंग्राळी गावातील युवक आकाश धोडीया (१९) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे . बेळगावच्या एका खासगी शाळेत शिकणारी अल्पवयीन मुलीला त्याने अहमदाबाद येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी नेले आणि येथे तिच्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कॅम्प पोलिसात केली होती. खडेबाजार स्थानकाचे एसीपी चंद्रप्पा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करून मुलीचे संरक्षण केले आहे. मूळचा गुजरात येथील रहीवासी असणारा आरोपी आकाशला पोलिसांनी अटक केली आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









