जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : टिळकवाडी येथील व्हॅक्सिंग डेपो मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षकांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनच्या दिवशी बेळगाव शहर, बैलहोंगल, रामदुर्ग, बेळगाव ग्रामीण या संघानी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक नितीन जाधव, राजू भातकांडे, जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेद पटेल, शहराच्या पीईओ जहिदा पटेल, बेळगांव तालुका पीईओ साधना बद्री, खानापूर तालुका पीईओ सुरेखा मिरजी,
जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. वंटगुडी, हॉकी बेळगावचे सचिव सुधाकर चाळके, विवेक पाटील, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्षा सिल्वीया डिलीमा, रमेश सिंगद, स्पर्धा अध्यक्ष नागराज भगवंतण्णावर, सहसचिव बापूसाहेब देसाई उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व परिचयानंतर पाहुण्यांचे हस्ते भारतमाता फोटोपूजन, मैदान पूजन, यष्टीपूजन व क्रिकेट खेळून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी क्रीडाशिक्षक जयसिंग धनाजी, उमेश बेळगुंदकर, प्रवीण पाटील, संतोष दळवी, देवेंद्र कुडची, सचिन कुडची, अर्जुन भेकणे, किरण तरळेकर, अनिल जनगौडा, शिवकुमार सुतार, दत्ता पाटील, सुभाष गंभीर, आय. एम. पटेल, रमेश अलगुडेकर, अल्लाबक्ष बेपारी, प्रकाश बजंत्री, विविध तालुक्यातील संघ उपस्थित होते.









