बेळगाव : येथील राउंड टेबल इंडियाच्या बेळगाव कॉसमॉस राउंड टेबल 237 द्वारे नवीन एक्स-रे मशीन (अल्फा 12 सीआर सिस्टम) भेट देण्यात आले. सदर मशीनचे उद्घाटन हॉस्पिटलचे अध्यक्ष अमित घाटगे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. मानसी घाटगे आणि एसबीजी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. आदिवेश अरकेरी यांच्या उपस्थितीत झाले. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सुदर्शन जाधव क्षेत्र अध्यक्ष राउंड टेबल एरिया 10 यांनी रिबन कापून आणि फलकाचे अनावरण करून मशीनचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी श्रेया सुंठणकर, निकिता देसाई, श्रीनिवास रायबागी, निखिल गौरव देसाई, सागर नंदगुडी, राज घाटगे-प्रकल्प संयोजक, प्रेरणा घाटगे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुदर्शन जाधव म्हणाले, रोगांचे निदान आणि प्रभावी उपचारांकरिता आधुनिक वैद्यकीय साधनांचे मोठे योगदान असून एसबीजी हॉस्पिटलतर्फे परिसरातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांसाठी सदर हॉस्पिटलचे कार्य अभिनंदनीय आहे. डॉ. मानसी घाटगे, डॉ. आदिवेश अरकेरी यांनी प्रशासन आणि देणगीदारांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. नवीन एक्स-रे मशीन रुग्णांची प्रतीक्षा लक्षणीयरित्या कमी कशी करेल तसेच अचूक आणि कार्यक्षम निदान सेवा कशी प्रदान करेल यावर त्यांनी प्रकाश टाकला. एक्स रे मशीन उद्घाटनप्रसंगी अमित घाटगे, राज घाटगे, श्रीनिवास रायबागी, सुदर्शन जाधव, डॉ. मानसी व इतर उपस्थित होते.









