हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती शहर परिसरात उत्साहात : मान्यवरांकडून शिवरायांना अभिवादन
बेळगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध संघटना तसेच संस्थांच्यावतीने शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शहर तसेच परिसरातील ठिकठिकाणी असलेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तींचे पूजन तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
श्रीराम सेना हिंदुस्थान
छत्रपती शिवाजी उद्यान येथे श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने शिवजयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी शिवरायांचे विचार व आजचे तरुण या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी नरू निलजकर यांच्यासह श्रीराम सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सह्याद्री मल्टिपर्पज सोसायटी 
काळी आमराई येथील सह्याद्री मल्टिस्टेट मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे मुख्य कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चेअरमन एन. बी. खांडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख सल्लागार अॅड. राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी आर. बी. बांडगी, प्रा. विक्रम पाटील, अनिल कणबरकर, मारुती निलजकर, ए. वाय. पाटील, बी. पी. ताशिलदार यासह इतर उपस्थित होते.
युवा समिती सीमाभाग
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्यावतीने शिवरायांची 395 वी जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिवमूर्तीला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, धनंजय पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अशोक घगवे, चंदू पाटील, प्रवीण रेडेकर आदी उपस्थित होते.
आरसीयू मराठी विभाग
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विभागप्रमुख प्रा. मनीषा नेसरकर यांनी रयतेचा राजा या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे, प्रा. संजय कांबळे तसेच एमए प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.
म. ए. समिती महिला आघाडी
महिला आघाडीच्यावतीने बुधवारी शिवजयंतीनिमित्त शिवाजी उद्यान येथे शिवरायांच्या मूर्तीला अभिवादन करण्यात आले. अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन झाले. यावेळी माजी नगरसेविका माया कडोलकर, सुधा भातकांडे, माजी नगरसेवक विजय भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.









