जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे तालुकास्तरीय काकती विभागीय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव पब्लीक स्कूल-शिंदोळी संघाने सेंट जॉन काकती संघाचा 2-0 असा पराभव करुन विजेतेपद पटकावित जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला. भुतरामहट्टी येथील महावीर स्कूलच्या मैदानावर घेण्यात आलेल्या या तालुकास्तरीय स्पर्धेत बेळगाव पब्लीक स्कूल, शिंदोळी संघाने अंतिम सामन्यात सेंट जॉन काकती संघाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. या संघाला शाळेचे चेअरमन डॉ. शिवकुमार रेवाशेट्टी, मुख्याध्यापिका राजेश्री रेवाशेट्टी, क्रीडा शिक्षक शट्टू पाटील व अरुण एस. यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









