बेळगाव : शिक्षण खात्यामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या 17 वर्षांखालील तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत शिंदोळी येथील बेळगाव पब्लिक स्कूल संघाने विजेतेपद पटकाविले. टिळकवाडी येथील व्हॅक्सिनडेपो मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रतिस्पर्धी ज्ञान प्रबोधन स्कूल संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या बेळगाव पब्लिक स्कूल संघाचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचबरोबर 14 वर्षांखालील पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
संघ पुढीलप्रमाणे
कर्णधार रोशन पायका, समर्थ कुडचीकर, अमृत जिनगौडा, दिगंत शंकरगौडा, प्रतीक निलजी, सुजन जिनगौडा, मोहम्मद कैफ, ओमकार कुरंगी, साई धामणेकर, विराज सोपीमठ, श्री सायबन्नावर, अरिहंत कंगलगौडा, संभव कुडचीकर, समर्थ पाटील, ओमकार सांबरेकर व आर्यन पावटे निवड झालेल्या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असून शाळेचे चेअरमन शिवकुमार रेवशेट्टी, प्राचार्या राजश्री रेवशेट्टी, प्रशासक सुनील हिरेमठ यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक शट्टू पाटील, आदर्श जी. प्रशिक्षक सुनील देसाई यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









