बेळगावचे नूतन प्रादेशिक आयुक्तपदाची सूत्रे डॉ. गौतम बगादी यांनी आज मंगळवार दि. ४ एप्रिल रोजी स्वीकारली.
अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त नजमा पिरजादे यांनी नूतन आयुक्तांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याआधी डॉ. गौतम बगादी यांनी बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.









