बेळगाव :
बेळगाव-मिरज अनारक्षित एक्स्प्रेसला पुन्हा एकदा नैर्त्रुत्य रेल्वेने मुदतवाढ दिली आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार बेळगाव-मिरज-बेळगाव या मार्गावरील अनारक्षित एक्स्प्रेसला दि. 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये जिल्ह्यात आलेल्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी बेळगाव-मिरज अनारक्षित एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. ही एक्स्प्रेस कोरोनापूर्वी पुश-पूल एक्स्प्रेसच्या नावाने सुरू होती. परंतु काही कारणांनी ती बंद करण्यात आली. पूरस्थितीवेळी रेल्वे पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु ती अद्याप कायम करण्यात आलेली नाही. दर दोन महिन्यांनी मुदतवाढ दिली जात आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता रेल्वे कायमस्वरुपी करावी, अशी मागणी होत आहे.









