कॅसलरॉक पॅसेंजर लोंढ्यातून निघणार
बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेने काही रेल्वेंच्या वेळापत्रकात बदल केला आहे. लोंढा-कॅसलरॉक दरम्यान विद्युतीकरणाचे काम सुरू असल्याने मिरज-कॅसलरॉक रेल्वे दि. 31 मार्चपर्यंत लोंढ्यापर्यंत धावणार आहे. तर कॅसलरॉक-मिरज पॅसेंजर लोंढा येथून निघणार आहे. कुडची ते उगार रेल्वेस्थानकांदरम्यान दुरुस्तीचे काम केले जात असल्याने दि. 27 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान बेळगाव-मिरज पॅसेंजर रद्द करण्यात आल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेने दिली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना बदललेल्या वेळापत्रकानुसार प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









