पोलीस-बीडीएफए यांच्यात प्रदर्शनिय सामना : यडा मार्टिन मार्बन्यांगची प्रमुख उपस्थिती
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य को-ऑप. सोसायटी पुरस्कृत, लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेला रविवारपासून लव्हडेल स्कूलच्या टर्फ मैदानावर प्रारंभ होत आहे. प्रदर्शनिय सामना पोलीस इलेव्हन व बीडीएफए इलेव्हन यांच्यात होणार आहे. प्रदर्शनिय सामना हा एकोप्यासाठी आणि क्रीडा खेळाडूवृत्तीसाठी असणार आहे. बेळगावात फुटबॉल क्रीडा प्रकाराचा प्रसार होण्यासाठी हा उपक्रम राबविला आहे. इतर देशांमध्ये फुटबॉलला अधिक प्राधान्य दिले जाते. 165 देशांमध्ये फुटबॉलची क्रेझ आहे. मात्र देश अजूनही 78 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विश्व चषक पात्रता फेरीत स्थान मिळविण्यासाठी आपल्या देशाला कठोर परिश्रम घेवून त्याचा दर्जा वाढावा, हा हेतु आहे, असे आवाहन बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे पॅट्रॉन व बेळगाव पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी केले.
या स्पर्धेत 20 संघांनी भाग घेतला असून चार गटात संघ विभागाले गेले आहेत. अ गटात – इलेव्हन स्टार, फँको एफसी, स्वस्तीक इलेव्हन, शिवाजी कॉलनी, दर्शन युनायटेड, ब गटात- निपाणी एफसी, गोवन्स एससी, मोहब्ल्यु इलेव्हन, वायएमसीए, कॉसमॅक्स स्पोर्ट्स क्लब, सी गटात- युनायटेट गोवन्स, युनायटेट युथ, चौगुले ब्रदर्स, झिगझॅग स्पोर्ट्स क्लब, फास्ट फॉल्वर्ड, डी गटात- ब्रदर्स एफसी, टिळकवाडीइलेव्हन, सिटी स्पोर्ट्स, टिळकवाडी एफए, साईराज एफसी या संघांचा समावेश आहे. प्रदर्शनिय सामन्यात पोलीस संघाचे नेतृत्व पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग हे करणार असून बीडीएफए संघाचे नेतृत्व ज्येष्ठ शिक्षक लेस्टर डिसोजा व अल्लाबक्ष बेपारी हे करणार आहेत. या सामन्याप्रसंगी सर्व पदाधिकारी व फुटबॉल शौकिनांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बीडीएफएचे अध्यक्ष पंढरी परब यांनी केले आहे.
सोमवारचे सामने
- इलेव्हन स्टार वि. शिवाजी कॉलनी : सकाळी 8 वा.
- निपाणी एफए वि. वायएमसीए : सकाळी 9 वा.
- युनायटेट गोवन्स, वि. झिगझॅग : दुपारी 3 वाजता
- ब्रदर्स एफसी वि. टिळकवाडी एफए : दुपारी 4 वाजता









