अतिरिक्त 12 बसेसद्वारे प्रवास सुलभ : तिकीट दरात मात्र वाढ नाही
बेळगाव : प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव-कोल्हापूर मार्गावर आता प्रथमच नॉनस्टॉप बसेस धावणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन प्रवासदेखील सुलभ होणार आहे. गुरुवार दि. 9 मार्चपासून या अतिरिक्त बससेवेला प्रारंभ होणार आहे. बेळगाव आणि चिकोडी आगारातून नवीन 12 नॉनस्टॉप बसेस धावणार आहेत. त्यामुळे बेळगाव-कोल्हापूर प्रवास आता सुखकर होणार आहे. बेळगाव-कोल्हापूर मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र, बेळगाव आगारातून धावणाऱ्या बसेस हत्तरगी, संकेश्वर आणि निपाणी येथून कोल्हापूरला जात होत्या. त्यामुळे बेळगाव-कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाया जात होता. त्यामुळे आता परिवहनने बेळगाव-कोल्हापूर मार्गावर नवीन अतिरिक्त 12 बसेस सुरू केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना कुठेही न थांबता बेळगाव-कोल्हापूर प्रवास करता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीखातर दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत ही विशेष नॉनस्टॉप बससेवा सुरू राहणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून दर 30 मिनिटांनी ही बस सुटणार आहे. बेळगाव बसस्थानकातून सकाळी 7.00, 7.30, 8.00, 8.30, 9.00, 9.30, 10.00, 10.30, 11.00, 11.30, 12.00. 12.30, 1.00, 1.30, 2.00, 2.30, 3.00, 3.30, 4.00, 4.30, 5.00, 5.30, 6.00 आणि 6.30 वाजता बसेस कोल्हापूरकडे धावणार आहेत. कोल्हापूर बसस्थानकातूनही बेळगाव येथे पोहोचण्यासाठी याच वेळेत बसेस धावणार आहेत.
अर्ध्या तासाला बस…
प्रवाशांच्या सोयीसाठी बेळगाव-कोल्हापूर मार्गावर नवीन 12 बसेस नॉनस्टॉप सोडल्या जात आहेत. प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा. दर अर्ध्या तासाला एक बस धावणार आहे. बस तिकीट दरात कोणतीही वाढ केलेली नसून दर पूर्वीचाच आहे.
-पी. वाय. नायक, विभागीय नियंत्रण अधिकारी.









