खड्डे चुकवण्याच्या नादात चिखले-बेटणेनजीक दोन अवजड वाहनांची टक्कर : एक चालक गंभीर जखमी
वार्ताहर/कणकुंबी
बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यावरील चिखले ते बेटणे दरम्यान खड्डे चुकविताना दोन अवजड वाहनांची समोरासमोर टक्कर झाल्याने ट्रकचालक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दि. 30 रोजी मध्यरात्री 1 च्या दरम्यान घडली. त्यामुळे बेळगाव-गोवा वाहतूक तब्बल दहा ते बारा तास ठप्प झाली होती. चोर्ला रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना चोर्ला रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. खराब रस्त्यामुळे जांबोटी-कणकुंबी भागातील स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना नरक यातनाच भोगाव्या लागत आहेत. या रस्त्यावर गेल्या दीड-दोन महिन्यात जवळपास पंधरा ते वीस अपघात घडले असून प्रशासन मात्र सुस्तावलेले दिसत आहे.
बुधवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान बेळगावहून गोव्याकडे जाणारी बाराचाकी ट्रक केए 32 बी 2267 तर गोव्याहून बेळगावकडे येणारी बाराचाकी ट्रक केए 22 ए 1390 ही दोन्ही अवजड वाहने चिखले ते बेटणे दरम्यान आली असता रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात दोन्ही ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. त्यापैकी एका ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला बेळगावच्या इस्पितळात दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक आहे. सदर अपघाताची माहिती जांबोटी पोलिसांना मिळताच जांबोटी ओपीचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. आय. बडीगेर यांनी घटनास्थळी भेट दिली. सकाळी काहीअंशी लहान चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने सकाळी 8 नंतर सुरू झाली. बेळगावहून व्रेन मागविण्यात आल्यानंतर दुपारी 1 वाजता दोन्ही अवजड वाहने बाजूला करून मार्ग मोकळा करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये काही वाहने रात्रभर अडकून राहिली. दुपारी 1 नंतर सहाचाकी वाहनांचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे जवळपास दहा ते बारा तास बेळगाव-गोवा वाहतूक बंद झाली होती.
चोर्ला रस्त्यावर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पंधरा ते वीस अपघात झाले असूनही प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. बुधवारी जांबोटी येथे चोर्ला रस्त्याच्या दुऊस्ती व विकासकामासंदर्भात जांबोटी भागातील नागरिकांनी बैठकीचे आयोजन केले होते. चोर्ला रस्त्याच्या विकासाचे व दुऊस्तीचे काम त्वरित हाती घ्यावे, अन्यथा रास्तारोकोसह उग्र आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. पुन्हा अपघात झाल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बुधवारी रात्री पुन्हा अपघात घडल्याने आता तरी प्रशासनाला जाग येणार का? हा अनुत्तरीय प्रश्न निर्माण झाला आहे. दीड वर्षापूर्वी बेळगाव-चोर्ला-गोवा या राज्यमहामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन रस्त्याच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी पावणे तीनशे कोटीचा निधी मंजूर करून रस्त्याच्या कामाचे औपचारिक असे उद्घाटनही केले होते. मात्र वनखाते आणि पर्यावरणप्रेमींनी या रस्त्याच्या विकासासंदर्भात आडकाठी घातल्याने चोर्ला रस्त्याचा विकास रखडला आहे.
कंत्राटदाराकडून चालढकलपणा?
तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या तात्पुरत्या दुऊस्तीसाठी 2 कोटी 65 लाख ऊपयांचा निधी मंजूर करून रस्त्याच्या दुऊस्तीच्या कामाला सुऊवातही झाली. परंतु कंत्राटदाराने केवळ काही ठिकाणीच मलमपट्टी करून ख•s बुजवण्याचे नाटक केले. रस्त्याच्या दुऊस्तीसाठी निधी मंजूर असताना कंत्राटदार चालढकल करत आहे. तसेच त्याला प्रशासनदेखील पाठीशी घालत आहे, असा आरोप जांबोटी-कणकुंबी भागातील नागरिकांनी केला आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा 
चोर्ला रस्त्यावर अनेकवेळा अपघात होऊनसुद्धा प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. वर्षभरातील अपघातांची संख्या पाहता खराब रस्त्यामुळे किमान सात ते आठ बळी गेले आहेत. तरीदेखील प्रशासन अद्याप जागे झालेले नाही. पुन्हा या रस्त्यावर ख•dयांमुळे अपघात घडल्यास प्रशासनाला जबाबदार धरून संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पश्चिम भाग विकास आघाडीचे प्रमुख व शिवप्रतिष्ठानचे राज्य अध्यक्ष किरण गावडे यांनी दिला आहे. चोर्ला रस्त्यावरील ख•dयांसंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकारी व कंत्राटदाराला वेळोवळी सांगूनही जांबोटी-कणकुंबी भागातील नागरिकांच्या समस्यांकडे जाणूनबुजून पाठ फिरवली आहे. यापुढे या रस्त्यावर ख•dयांमुळे अपघात घडल्यास संबंधित अपघातग्रस्त नागरिकांनी किरण गावडे मो. 9019830778, तसेच लक्ष्मण कसर्लेकर मो. 9482000279 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन किरण गावडे यांनी केले आहे.









