बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी
कर्नाटक राज्य सार्वजनिक शिक्षण खाते व शिमोगा जिल्हा शिक्षण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय प्राथमिक व माध्यमिक फुटबॉल स्पर्धेत प्राथमिक विभागात बेळगाव विभागाच्या सेंट जोसेफ संघाने या गटात विजेतेपद पटकाविले आहे. म्हैसूर उपविजेतेपद तर डीवायईएस बेंगळुरला तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. बेळगावच्या 12 खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.
शिमोगा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम सॅक्रेड हार्ट स्कुल मैदानावर आयाजित केलेलया प्राथमिक व माध्यमिक गटातील सामने खेळविण्यात आले. प्राथमिक गटात मुलींमध्ये शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बलाढय़ म्हैसूर संघाला बेळगाव विभागिय संघाने शुन्य बरोबरीत रोखले. या सामन्यात दोन्ही संघानी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले. दुसर्या साखळी सामन्यात बेळगाव विभागिय संघाने गुलबर्गा विभागिय संघाचा 6-0 असा पराभव केला. तिसर्या साखळी सामन्यात बेळगाव विभागिय संघाने बेंगळुर संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात किंजल तलवार व सािल्वया गोम्स यांनी प्रत्येकी 1 गोल केले. साखळी सामन्यानंतर म्हैसुर व बेळगाव विभागिय संघाचे गुणफलक समान झाल्याने शेवटी सर्वाधिक गोल करणार्या संघाला विजयी घोषित करण्यात आले. या स्पर्धेत बेळगाव विभागिय संघाने 8 गोल केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या संघाला मानस नायक, मॅनवल डिक्रुज, क्रीडा शिक्षक मिनाक्षी जाधव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. या गटात बेळगाव विभाग विजेता, म्हैसुर विभाग उपविजेता, तर बेंगळोर विभागिय संघ तिसर्या स्थानावर तर गुलबर्गा चौथ्या स्थानावर राहिला.
मुलांच्या गटात बेळगाव विभागिय संघाने 2 गुणांसह तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बेळगाव विभागिय संघ ( सेंट जोसेफ ), उपविजेता म्हैसूर व तिसरा क्रमांक पटकाविलेला बंगळूर संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या विजेत्या बेळगाव विभागिय संघातील 12 खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड करण्यात आली आहे.