म्हैसूर जम्बो सवारीत मायाक्कादेवी मंदिराचा देखावा
बेळगाव : म्हैसूर दसरोत्सवात बेळगाव जिल्ह्यातील चित्ररथाने लक्ष वेधून घेतले. जिल्हा पंचायतीच्यावतीने चिंचली, ता. रायबाग मायाक्कादेवीच्या मंदिरावर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला होता. गुरुवारी झालेल्या जम्बो सवारीत 31 जिल्ह्यातील चित्ररथांनी भाग घेतला होता. राज्य सरकारचे आठ, विविध महामंडळांचे तेरा व इतर सहा असे एकूण 58 चित्ररथ मिरवणुकीत होते. मायाक्कादेवीचा इतिहास, देवीचे माहात्म्य सांगणारा चित्ररथ कलाकार बी. एस. गस्ती व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केला होता. बेळगाव जि. पं. चे योजना संचालक रवी बंगारेप्पन्नावर हे चित्ररथाचे नोडल अधिकारी म्हणून उपस्थित होते.









