बेळगाव जिल्हा 93 पदकांची कमाई तर गदग जिल्हा दुसऱ्या स्थानी
बेळगाव : बेळगाव हौशी ज्युडो संघटना आयोजित पहिल्या कर्नाटक राज्य खुल्या ज्युडो स्पर्धेत शेवटच्या दिवशी बेळगाव जिल्हा संघाने 47 सुवर्ण, 21 रौप्य व 25 कांस्यपदक एकूण 93 पदकांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. बेळगावच्या गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पहिल्या खुल्या ज्युडो स्पर्धेत संपूर्ण राज्यातून जवळपास 16 जिह्यातून 470 ज्युडोपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत आठ ते दहा वयोगट मिनी किड्स, दहा ते बारा वयोगट किड्स, बारा ते पंधरा वयोगट सब ज्युनियर, 15 ते 17 वयोगट पॅडेट, 17 ते 21 वयोगट ज्युनिअर, तर 21 वर्षाखालील वरिष्ठ गटासाठी या स्पर्धा घेण्यात आल्या.
बेळगाव, विजापूर, बागलकोट, गदग, गुलबर्गा, उत्तर कन्नडा, बेंगलोर अर्बन, बेंगळूर ग्रामीण, मंड्या, हासन, कारवार, म्हैसूर, बिदर, कोलार, बेल्लारी व शिवमोगा या आणि सहभाग घेतला होता . एकूण 68 विविध गटात 272 पदकांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली.होती या स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघाने 47 सुवर्ण, 21 रोप्य, व 25 कांस्पदकासह 93 पदकांची कमाई करीत सर्वसाधारण विजेतेपदक पटकाविले. बागलकोट जिह्याने सात सुवर्ण, चार रैप्य, चार कांस्पदकासह पहिले उपविजेतेपद, तर सहा सुवर्ण, तीन रौप्य एक कांस्यपदक गदग जिह्याने दुसरे उपविजेतें पटकाविले. स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे उद्योजक वेंकटेश पाटील, निवृत्त युवजन क्रीडाधिकारी विलास घाडी, धारवाड जिल्हा हौशी ज्युडो ज्योती पाटील,युनिव्हर्सिटी ब्ल्यू डॉ. शरद जवळी, जितेद्रसिंग,डॉ. तन्वी एम.एन यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना पदके, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.









