तीन सुवर्ण, आठ रौप्य, चौदा कांस्यपदकांची कमाई
बेळगाव : कर्नाटक स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्यावतीने हुबळी येथे झालेल्या किओ अधिकृत राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बेळगाव जिल्हा कराटेपटूंनी 3 सुवर्ण, 8 रौप्य व 14 कांस्यपदकांसह एकूण 25 पदकांची कमाई करीत यश संपादन केले आहे. हुबळी येथे घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत 28 जिह्यातून खेळाडू सहभागी झाले होते. बेळगाव जिह्यातून 75 खेळाडूंची निवड झाली होती. तर या स्पर्धेचे आयोजक व अखिल कर्नाटका स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष अरुण माचा आणि जनरल सेक्रेटरी भार्गव रे•ाr यांनी बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर आणि जनरल सेक्रेटरी जितेंद्र काकतीकर यांचा खास गौरव करण्यात आला. या स्पर्धेमधून बेळगाव जिल्ह्यातून तीन कराटेपटूंची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वरील सर्व विजेत्या कराटेपटूंना उपाध्यक्ष रमेश अलगुडेकर, दिपक काकतीकर, प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती या सर्वांचे मार्गदर्शन लाभत आहे.









