राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट “जिल्हा रिटर्निंग ऑफिसर” पुरस्कार बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
भारतीय निवडणूक आयोग आणि कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज बुधवार दि. 25 जानेवारी दुपारी 1 वाजता बेंगलोरच्या सर पुत्तन्ना चेट्टी टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या “राष्ट्रीय मतदार दिन” कार्यक्रमात नितेश पाटील यांना पुरस्कार प्रदान केला. यावेळी कर्नाटकाचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना आणि बीबीएमपीचे मुख्य आयुक्त तुषार गिरीनाथ उपस्थित होते.