अध्यक्षपदी चेतन ताशिलदार, सचिवपदी क्रितेश कावळे
बेळगाव : फुलबाग गल्ली येथील शिवबसव प्लाझा येथे बेळगाव जिल्हा जिम ओनर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर नूतन कार्यकारिणीची निवड झाली. अध्यक्षपदी चेतन ताशिलदार तर सचिवपदी क्रितेश कावळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बेळगाव जिल्हा जिम ओनर्सचे संस्थापक किरण कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षांतील जमा-खर्च देण्यात आला. बेळगाव जिल्हा जिम ओनर्सचे उपाध्यक्ष म्हणून नागेद्र मडिवाल, राकेश वाधवा, विजय चौगुले, खजिनदार सचिन मोहिते, उपखजिनदार विशाल चव्हाणे, उपसेक्रेटरी जय कामू, दयानंद निलजकर कार्यकारी संचालक राजकुमार बोकडे, शेखर जाणवेकर, किरण पाटील, सभासद सुरेश धामणेकर, अश्विन निंगण्णवर, सलमान के., यश गस्ती यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी इतर सभासदही उपस्थित होते. पुढील काळात जीम ओनर्सतर्फ अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.









